Wednesday, December 24, 2008

कविवर्य संदीप खरे

शहाणेच सारे येथे कौतुक कुणाला ?
वेडे काही बोलायाचे असल्यास बोला
वेड कळते मनाला वेड भिड़ते मनाला
त्याच्यागत थोड़े वेडे लिहायला हवे....
कधीतरी वेड्यागत वागायाला हवे....
-for u sandeep

NRI

एकवेळ अशी येते की आकाशाचं होतं छप्पर...
आणि पाय रोवून जिथे उभे असतो तेच घरं...
आपणच होतो आपले जिवलग...
नेटाने धरून ठेवतो चार भिंती...

संध्याकाळ होते आणि आपल्या झाडाकडे उडावसं वाटतं...
पण तिथे जर कुणी नसेल आता आपली वाट बघतं ?
बसल्या फांदीवर रात्र निघून जाते...
एक गेली तशा बाकीच्या जातील...

पण पसरून बसलेल असत कुणी तिकडे जुने अल्बम्स्..
कुरवाळत.. आपल्या गणतीतही नसलेली बक्षिसं..सर्टिफिकेट्स
आणि तिकडेही सरते रात्र...
आवरता आवरता आठवणींचे पसारे...

नाही म्हणायला रोजच गप्पा होतात, विचारपूसही जेवण- खाण्याची
पण पोट भरत नाही.. हे काय सांगितल नाही तरी, कळत नाही?
जमवतो रोजचं आणि सणासुदीचं सारं...
हं...हाताची चव थोडीशी कमी पड़ते...

बेसावध हळव्या क्षणी ऐकायची असते.. दूरून एक कातर हाक..
ज्यानंतरच्या कल्लोळात कुठ्ल्याचं व्यवहारांना सापडू नये आपली वाट..
पण गळ्याशी दाटलेलं दूर सारून हसायची...
त्यांचीही सवय हुकुमी असते...

सुरवातीच नाटक असत, गोडच गोड.. छान छान.. मजाच मजा..
चार दिवसांनी खरही वाटायला लागत.. भूमिकेत शिरता शिरता..
आजूबाजूला सापडतात.. नवी नाती.. नवे सोबती..
आणि नव्या नवलाईची नवी घरटी आकारतात..

आपल्याला वाटतं आता वाट विसरलो अन् ते वाट बघायला..
जबाबदारांच्या अदृश्य शृङ्खला.. आपणच हौसेने मिरवलेल्या
इकडे मुसमुसत झाड़.. तिकडे वेड पाखरू..
आयुष्य नावाचं पाणी मधल्या मधे वाहून जातं..

आकाशाची स्वप्नं..अशीच बरसत रहातात..
त्यात मातीचे अश्रू बेमालूम मिसळतात..
आणि बघणार्‍यानां येतो फ़क्त यशाचा सुगंध..

अश्या वेड्या पाखरांची मंडळ होतात.. संमेंलने..
आणि विरही झाडांचे ज्येष्ठ नागरिक संघ.. नी कट्टे..
आम्हाला काय? दोन्हीकडून निमंत्रण अणि टाळ्या!!

अनुश्री ताई- MBBS

i m done with my " umar-kaid or kala-pani" ki saja in dhule..yeah i mean 4 and 1/2 yrs is practically entire life .........and i spent it...for merely being a graduate.not the best...nothing near to my dream...i dont know how many more years..its gonna take to be a good clinician........people retire @ 22 these days....while some dont even have a career...cheers !!!

Monday, October 27, 2008

म्हंटलं तर

इतकं जपूनही.. मैत्रीचा एक एक धागा उसवत जातो........ती
म्हंटलं तर आहे पण..
म्हंटलं तर नाही पण..

इतकं शोधूनही.. आपलं अस कुणी अजून सापडत नाही......ती
म्हंटलं तर आहे पण..
म्हंटलं तर नाही पण..

नवे मखमली रस्ते.. तरी जुन्या काट्यांची बोच हुळहुळते.....ती
म्हंटलं तर आहे पण..
म्हंटलं तर नाही पण..

नवे वारे.. का चंद्राच्या आठवणीने अवेळी भरती येते........ती
म्हंटलं तर आहे पण..
म्हंटलं तर नाही पण..

समेवर भेटायच ठरल होत.. पण लय बदलत गेली........ती
म्हंटलं तर आहे पण..
म्हंटलं तर नाही पण..

उत्तर सापड़लय..पण समोरचे प्रश्न बदललेत..पुन्हा सारं कठीण
म्हंटलं तर आहे पण..
म्हंटलं तर नाही पण..
कधी कधी मला वाटत फक्त जगाव....

कविता लिहाव्यात..मनाला येईल तिकडे भटकत रहाव..

जगभर फिराव..जे जे चांगल आहे ते ते बघाव..

प्रत्येक क्षणी भरभरून aanand घ्यावा...

majha एक मित्र मला म्हणाला होता...जोपर्यंत ekhaadee गोष्ट तुमचीaawad असते तोपर्यंत त्यात मजा येते

ज्या क्षणाला हा विचार येतो.. की ही गोष्ट सगळ्यात चांगली करुन दाखव ... its not fun anymore

जोपर्यंत kuni mhanale navte...mothi doctor hosheel..mothi kavayitri hosheel...it was fun..

parwa meech mala mhanale...mala saglyat chan ayushya jagun dakhvaaychay...

really...is that wat i really want...and whos gonna be the judge..Nah...

mala fakt jagaaychay !

may be i ll end up being ....Just Another Somebody...

But it ll be fun !!!

Thursday, October 23, 2008

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...