Monday, October 27, 2008

म्हंटलं तर

इतकं जपूनही.. मैत्रीचा एक एक धागा उसवत जातो........ती
म्हंटलं तर आहे पण..
म्हंटलं तर नाही पण..

इतकं शोधूनही.. आपलं अस कुणी अजून सापडत नाही......ती
म्हंटलं तर आहे पण..
म्हंटलं तर नाही पण..

नवे मखमली रस्ते.. तरी जुन्या काट्यांची बोच हुळहुळते.....ती
म्हंटलं तर आहे पण..
म्हंटलं तर नाही पण..

नवे वारे.. का चंद्राच्या आठवणीने अवेळी भरती येते........ती
म्हंटलं तर आहे पण..
म्हंटलं तर नाही पण..

समेवर भेटायच ठरल होत.. पण लय बदलत गेली........ती
म्हंटलं तर आहे पण..
म्हंटलं तर नाही पण..

उत्तर सापड़लय..पण समोरचे प्रश्न बदललेत..पुन्हा सारं कठीण
म्हंटलं तर आहे पण..
म्हंटलं तर नाही पण..

1 comment:

 1. आनुश्री सुंदर कवियत्री , तरी खिन्न का मनी ......
  ती
  म्हंटलं तर आहे पण..
  म्हंटलं तर नाही पण..

  आपला ,
  (खोडकर) विशुभाऊ

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...