Sunday, January 25, 2009

काय मागू?

काय मागू?
करायला विचार
जगायला आधार
बघायला आभाळ
निजायला घरदार मागू?
काय मागू?

लिहायला शब्द
सोसायला अर्थ
भिडायला भावना
जुळायला यमक मागू?
काय मागू?

प्यायला प्याला
कंपनीला मित्र
चढायला झिंग
विसरायला 'ती' मागू?
काय मागू?

पडायला प्रेम
धरायला हात
रमायला बायको
वाढवायला पोरं मागू?
काय मागू?

जपायला संस्कृती
जाळायला पोस्टर
चघळायला वाद
टाकायला मत मागू?
काय मागू?

जाऊ दे
आज रोख
उद्या उधार मागू !
anushree vartak 24/1/09

6 comments:

 1. छान कविता लिहीलीय. अभिनंदन!

  -सतीश रावले

  ReplyDelete
 2. sundarach blog. jara blogcha rang badalala tar bare zale aste

  ReplyDelete
 3. just superb.........Ata me kay magu aaplyakade mhanajech ata mazya aplyakadun asha wastav-vadi kavitanchya apeksha wadhalyat..........

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...