Sunday, March 15, 2009

भ्रूण हत्या..

बरच आहे एका अर्थी..

लाडके, मला शक्य असत तर ..


मी दिलं असत तुला मोकळ तुझ आभाळ..

आणि भरल असत आत्मविश्वासाच बळ..

बरच आहे एका अर्थी..


मातृत्वासारख्या स्वयंपूर्ण भावनेला लागतो आधार..

अजूनही इथे..एक बापाच नाव..एक लग्नाचा करार..

बरच आहे एका अर्थी..


महिलादिनाला हसतात सगळे पुतळे अन तसबिरी..

बैलांचा पण साजरा होतो पोळा..उरलेल्या ३६४ च काय ?

बरच आहे एका अर्थी..


वाचवलच आहे मी तुला अस समज..समजून घे तू तरी..

जिवंतपणी भोगाव्या लागणार्‍या जाचातून सुट्लीस खरी..

बरच आहे एका अर्थी..

बरच आहे एका अर्थी..

happy woman's day !

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...