Tuesday, May 26, 2009

ye mera prem patra padhkar...
प्रिय,

मी तुझ्या वर्गात असते.....मी तुझ्या वर्गात असते.............

कुणीतरी बोट दा़खवून म्हणाल असत, "तो बघ तो वेडा ! "

मग सगळ्यांची नजर चुकवून मी तुला पाहिल असत..

आणि मग रोजच........... अटेडंन्स दिल्यासारखं..

मग कधी बंक करताना.. मैत्रिणीला सांगितल असत..

तुझ्यावर लक्ष ठेवायला...प्रॉक्झी मारल्यासारखं..

तुझी कोणी नाही ना....कसून चौकशी केली असती..

आणि असती तरी..मनात रजिस्टरही केली नसती..

वर्ग रिकामा झाल्यावर.. तू चुरगाळून फेकलेला कागद उचलला असता

आणि वहीच्या मधोमध..रात्री..चादरीच्या आत..टॉर्चमधे वाचला असता

अर्धवट ओळींनी जागवली असती पहाटेच्या स्वप्नांतही हुरहुर..

आणि दिवसभर मनात त्या आठवणींनी माजवले असते काहूर..

तुझ्या अक्षराच्या वळणांनी माझ्या सरळसोट रस्त्यांना पिसाटल असत..

मी ही ब्रेल वाचणार्‍या आंधळ्यासारख त्यांना वारंवार कुरवाळल असत..

कवितेच्या स्पर्श, रंग, गंध, छंद आणि शब्दांनी झाले असते खल्लास..

रेंगाळणार्‍या तुझ्या कवितांच्या नादाने, लांबला असता श्वास न श्वास..

एखाद्या गॅदरिंगला तू , तुझी एखादी कातिल गझल गायला असतास..

तुझ्यावर फिदा सुंदर्‍यांच्या नजरेत फुका माझा जीव जाळला असतास..

असच वेड्यागत तुझ्यावर मरता मरता कॉलेज संपल असत..

पण तुझ मला अन माझ तुला कधी काही कळलच नसत..

एखाद्या मोठ्या मुश्किलीने जमलेल्या अड्ड्यात, नव्या नोकर्‍या सांभाळून..

म्हणाला असतास,"दोस्त,माझ्यावर प्रेम करणारं कुणी भेटलचं नाही अजून"

तेव्हां सांगितल असतं एखाद्या मित्रानं "अरे, असं कसं ती होती ना रे, ती ?

क्या दोस्त अख्ख्या कॉलेजला माहित्ये..तुम्ही लेको जगा आपल्याच तंद्रीत!"

माझा स्टॉप शोधून, मग तुला बळजबरीने घेउन आलं असत अन..

कुणीतरी बोट दाखवून म्हणालं असत," ती बघ, तीच ती वेडी ! "

मी तुझ्या वर्गात असते.....मी तुझ्या वर्गात असते.............

वेडीच झाले असते..वेडीच झाले असते..वेगळ काही नाही !

Sunday, May 17, 2009

दोन प्रकारची माणस शांत झोपतात..एक ज्यांना स्वप्नचं पडत नाहीत..अन एक ज्यांची स्वप्नं पूर्ण होतात..माझ्यासारखे काही अर्धवट झोपेत..उठ्ल्या क्षणाला रागात जागे होत..स्वप्नांची भुतं मानगुटीवर नेतात..कधी वाटत स्वप्नांना आयुष्य आहे..कधी वाटत आयुष्य हेच स्वप्न आहे..जाग यावी..निसटून जावं..

Thursday, May 14, 2009

हं.. आता मुम्बईकर म्हणुन मी जरा स्थिरावल्ये... मजा येत्ये..मी हे सगळ धुळ्याला शिकताना खुप miss करायचे. मला मुम्बईच फास्ट लाइफ प्रचंड आवडत ! just imagine.. एक काळ असा होता की मला झोपवायला आई बाबा रोज मला गिरगांव चौपाटीवर न्यायचे, अणि इतक्या वर्षानंतर में पुन्हा चौपाटीवर गेले..it was amazing..जेजे खुप मस्त आहे..जबरदस्त infrastructure..it has potential to be future aiims... माझ्यासाठी हे सगळ खुप नवीन आहे 50 seat n no pg वाल्या एका college मधून इतक्या चांगल्या college मधे काम करण..i m lucky to be here...no small town mentality..everbody is so proffessional...no gossiping...no gappa..कधी कधी धुळ्यातल्या माणसांची आपुलकी मी miss karte..

Medicine is a very hard proffession...
आता पुर्वीसारख नाही..i am 22 and yet to get a degree (after internship)...i wont advise any1 to be a dr...u r studying till 30 ..without name , fame n money !!! pan in this time of recession..i m glad to be a doc..i dont ve to worry abt a job..

internship is a full time job with 1750 stipend..
हो एवढाच !..दिवसभर mechanical कामे करत राहातो, मामा आणि नर्स लोकांची...धुळ्याला तस नाहीये..there r no residents..n u are doc in charge,, i wish मला तिथून intership करता आली असती तर..i wish i din ve to study this yr...मी खूप train झाले असते dr म्हणून..पण अख्खी residency पडल्येय ते शिकायला...so here i am...sincerely अभ्यास करत्येय...ppl keep on asking me...अनुश्री बरेच दिवसात कविता नाही... ह्या वर्षी नाटक नाही ? अनुश्री तुझ्या albumch काय झाल? did u get ur research paper published? But i ve to mug billions n zillions of MCQs n high yield facts...
yeah..zillions...

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...