Tuesday, May 26, 2009

ye mera prem patra padhkar...
प्रिय,

मी तुझ्या वर्गात असते.....मी तुझ्या वर्गात असते.............

कुणीतरी बोट दा़खवून म्हणाल असत, "तो बघ तो वेडा ! "

मग सगळ्यांची नजर चुकवून मी तुला पाहिल असत..

आणि मग रोजच........... अटेडंन्स दिल्यासारखं..

मग कधी बंक करताना.. मैत्रिणीला सांगितल असत..

तुझ्यावर लक्ष ठेवायला...प्रॉक्झी मारल्यासारखं..

तुझी कोणी नाही ना....कसून चौकशी केली असती..

आणि असती तरी..मनात रजिस्टरही केली नसती..

वर्ग रिकामा झाल्यावर.. तू चुरगाळून फेकलेला कागद उचलला असता

आणि वहीच्या मधोमध..रात्री..चादरीच्या आत..टॉर्चमधे वाचला असता

अर्धवट ओळींनी जागवली असती पहाटेच्या स्वप्नांतही हुरहुर..

आणि दिवसभर मनात त्या आठवणींनी माजवले असते काहूर..

तुझ्या अक्षराच्या वळणांनी माझ्या सरळसोट रस्त्यांना पिसाटल असत..

मी ही ब्रेल वाचणार्‍या आंधळ्यासारख त्यांना वारंवार कुरवाळल असत..

कवितेच्या स्पर्श, रंग, गंध, छंद आणि शब्दांनी झाले असते खल्लास..

रेंगाळणार्‍या तुझ्या कवितांच्या नादाने, लांबला असता श्वास न श्वास..

एखाद्या गॅदरिंगला तू , तुझी एखादी कातिल गझल गायला असतास..

तुझ्यावर फिदा सुंदर्‍यांच्या नजरेत फुका माझा जीव जाळला असतास..

असच वेड्यागत तुझ्यावर मरता मरता कॉलेज संपल असत..

पण तुझ मला अन माझ तुला कधी काही कळलच नसत..

एखाद्या मोठ्या मुश्किलीने जमलेल्या अड्ड्यात, नव्या नोकर्‍या सांभाळून..

म्हणाला असतास,"दोस्त,माझ्यावर प्रेम करणारं कुणी भेटलचं नाही अजून"

तेव्हां सांगितल असतं एखाद्या मित्रानं "अरे, असं कसं ती होती ना रे, ती ?

क्या दोस्त अख्ख्या कॉलेजला माहित्ये..तुम्ही लेको जगा आपल्याच तंद्रीत!"

माझा स्टॉप शोधून, मग तुला बळजबरीने घेउन आलं असत अन..

कुणीतरी बोट दाखवून म्हणालं असत," ती बघ, तीच ती वेडी ! "

मी तुझ्या वर्गात असते.....मी तुझ्या वर्गात असते.............

वेडीच झाले असते..वेडीच झाले असते..वेगळ काही नाही !

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...