Wednesday, September 16, 2009


तु़झ्या शब्दांनी कासावीस होण्यासारखं
जगात दुसरं सुख काय ?
पण ते मा़झ्याकरिता नाहीत
मी काय करू ? हाय !

वेदनेला अर्थ भिडतो,
वाटते जन्म जाहला..
श्वास कुठे अडकतो रे?
असे भान यायला..

जालीम आहे रे औषधच..
प्यावे तडफडावे, कसे सहावे?
कडेलोटावरही या मी खूशच..
मरावे तर अशा शब्दछळाने !

अ़क्षरांचे व्रण काळजावर उरलेले..
आवाजात सारे थांग बुडलेले..
होते कुणा कुणासाठी जे जपले..
मोजकेच उसासे ते ही अता विरले..

सगळ सगळ गमावून जे मिळत..
त्यावरच हक्क सांगते आहे..
तुझ्याच शब्दांवर उधळण्यासाठी..
ती अनाम ओढ मागते आहे...
-अनुश्री

2 comments:

 1. :))))))))))))) Loved this specially 2,3n 5 ve kadve aflaatun aahe. Bakki shbadch naahit kaay lihu?

  __/\__

  tu gaates hi as lihilys* ata te aikaayla milo :)


  lihilys na?

  ReplyDelete
 2. thanks, me he 'lagate anaam odh' eklyavar lihila hota,
  yes i do sing, compose...i ll podcast em some time :)

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...