Wednesday, September 16, 2009

पाउस असा का बरसावा ?
मनात खोल खोल रुजे..
तू असा डोळ्यात येता..
सारेच.. कसे.. हळवे.. ओले..

आठवणींच्या आल्या सरी..
आठवणीच या परि..
भिजत उभी अजून मी..
वाट जरी अंधारली.. का पाहिली ?

चिंब न्हाउनी आर्त मी..
कोरडी उरले तरी..
साजणाच्या मिठीतही..
तुझी आसवे पोचली.. बोचली..

पाउस असा का बरसावा ?
पाउस असा का बरसावा ?

-अनुश्री

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...