Tuesday, January 12, 2010

अनुश च आयुष्य...

दिवस सरतात, महिने, वर्ष......

मधेच कधीतरी आठवत... अरे जगायच राहून गेलं...

लोकल मधून प्रवास करताना..एखाद्या गाफील क्षणी वाटत...अरे पुढच स्टेशन आलच नाही तर...

मग खूप हळहळ वाटते...अस वाटत आत्ताच्या आत्ता, ओळखीच्या सगळ्यांना भेटून एकदा मनापासून म्हणाव.. thanks..for everything !

एक लांब श्वास घेऊन..खूप खूप जगावस वाटत....

जेव्हा पण मी निराश होते, सगळ सगळ व्यर्थ वाटायला लागत...हेच काही खोल खोल श्व्वास मला त्या गर्तेतून खेचून आणतात..माझा एक मित्र दोन वर्षांपूर्वी अचानक गेला...तेव्हांही आम्ही सगळे काही काळासाठी असेच निराश झालो होतो...

मला आठवतय...काय अर्थ आहे या आयुष्याला? ह्या एका प्रश्नाने आमचे दिवस-रात्र झाकोळून जात असत...

त्यावेळी ह्या ओळींनी नवी उमेद दिली...

अजूनही देतात...पुन्हा पुन्हा.....

"मला पुलंच एक वाक्य आवडत-

'जीवन जीवन जे म्हणतात ना, ते जन्मापासून मरणापर्यंत नुसत आपल्या वाटेत आड येत असत.बाकी काही नसत.

कधी उगाचच मठ्ठपणे आडव पडून राहात. मग कंटाळा येउ नये म्हणून आपण त्याला लेबले लावतो.

प्रेम म्हणतो, आई म्हणतो, धर्म म्हणतो, काय वाटेल ते म्हणतो......

एरवी जीवन ही एक निरर्थक फसवी वस्तू आहे. जगात देव नाही, काहीच नाही. ज्या क्षणाला आपण श्वास घेत असतो ना,

तेवढा क्षण असतो! '

मला स्वतःला अस वाटत की आयुष्याची टोटल शून्य असली तरी काही सुख जमा होउन मग दु:ख वजा होत ना....

आपण किती दिवस जगणार याची शाश्वती कुणालाच देता येत नाही, काळ कुणासाठीच थांबत नाही, म्हणून आपल्या वाटेला येणारा प्रत्येक क्षण भरभरून जगायचा..

आपण का आणि कशासाठी जगतोय? माहीत नाही.... पण आपण जगतोय हेच सगळ्यात मोठं सु़ख आहे.....

ही opportunity कुणी दिली, आपल्यालाच का? माहीत नाही......

पण प्रत्येक श्वासाची अनुभूती...जगात जे जे चांगल आहे त्याचा आस्वाद घेणं... आपल्याला आवडेल ते सर्व करणं..मनापासून मैत्री करणं..प्रेम करणं.....जवळच्यांचा विरह... त्रास काढणं.. निराश होणं..पुन्हा त्यातून बाहेर येणं..एकटेपणा..सोबत...मला तरी प्रत्येक गोष्ट आवडते...

आयुष्याच कोड सोडवत बसण्यातच खरी मजा आहे. कारण इथे चूक बरोबर काहीच नाही. कुणीच रिकाम्या हाताने जात नाही... काहीतरी स्पेशल करूनच जातो.."

2 comments:

  1. हे अनु निराश बिराश व्ह्यायचं नाही बरं कधी . लक्षात घे लोकांना आपल्या पेक्षा फार जास्त प्रॉब्लेम्स आहेत . निराशेचं नाव काढायचं नाही कधीच. मस्त बिनधास्त जगायचं. हे आपलं लाईफ आहे. कसं जगायचं ते आपण ठरवायचं. मी सांगतो चार चौघात राहुन मस्त जगायचं. बोलायचं . मोकळे पणे. जे करावं वाटलं ते करायचं. कोनाच्या बापाला भ्यायचं नाही. सरळ म्हणायचं "अबे !तु कोन बे?". टाईट रहणे का. क्या? वट से रहणे का. ज्यादा सोचणे काच नही. समझा क्या. जो दिल मे आया वो करने का. डरने का नही. जो डरा सो मरा. क्या? वी दा सावरकरचे " माझी जन्मठेप" विकत घेवुन ताबडतोब वाच. मग कळेल लाईफ काय आहे .

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...