दोन प्रकारची माणसं शांत झोपतात. एक ज्यांना स्वप्नच पडत नाहीत अन एक ज्यांची स्वप्नं पूर्ण होतात. माझ्यासारखे काही अर्धवट झोपेत, उठ्ल्या क्षणाला रागात जागे होत, स्वप्नांची भुतं मानगुटीवर नेतात. कधी वाटतं स्वप्नांना आयुष्य आहे. कधी वाटतं आयुष्य हेच स्वप्न आहे! जाग यावी,निसटून जावं.

Sunday, February 7, 2010

हा असा चंद्र.. ही रात...

त्या चंद्राकडे कधीकाळी मी मागितला होता हा चंद्र..

वार्‍यानेही आवरला होता माझ्या केसांना उधळण्याचा मोह..

म्हणून आज आलेत अलगद तुझ्या हातात, ते, चंद्र, रात्र, अन मी पण..

ही सारी तुझीच जादू अस तुला वाटाव हेही ना माझ्याच मनासारख..

- मी

नदीकाठावर पाण्यात पाय सोडून चांदण पाहात बसताना हळ्व्या मनाची सोबत हवी..

तर निसरड्या गोट्यांवरून तीच नदी पार करताना दांड्ग्या हातांची..

अशी हजारो क्षणी लागणारी हजारो रुपांतली सोबत फक्त कविताच देऊ शकते..

- सुनीताबाई

2 comments:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...