Sunday, February 7, 2010

केव्हां तरी पहाटे...

कधी वाटत,

तुझ्या आयुष्यात सुंदर रात्र होउन याव..

तुझ्या स्पर्शाने हलकेच बहरत जात..

तुझी सगळी स्वप्न पूर्ण करत..

साख्ररझोपेतच अलविदा करून जाव..आठवण म्हणून माझा सुगंध ठेवावा..

जाईच्या कळ्यांत तुझ्या उशाशी..

आणि तुझी आठवण म्हणून जपावी..

माझ्या ओठांवर तू लिहिलेली कविता..


-मी
लक्ष लक्ष वेळ तुला रिकामीच पाठवावे..

लक्ष लक्ष वेळ तुला आठवावे साठवावे..

पहाटेच्या कळ्यांपाशी थोडे मागावे इमान..

थोडे सांगावे तुलाही माझ्या मनाचे प्रमाण..

लक्ष लक्ष तू अन लक्ष लक्ष वेळ..

मी एक अनंताचे चुकले पाउल..


- खानोलकर

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...