Friday, July 2, 2010

सिरिअल्स्

उसनं दु:ख दुसर्‍याचं, तेवढच तुझ्यासाठीचं रडून

घेते


भांडण असतं दुसर्‍याचं, समजूत माझी मीच काढून घेते

समोर प्रतिबिंब दुसर्‍याचं, त्यातचं तुला पाहून घेते

कथानक कुण्या दुसर्‍याचं, आपल्याला उगीच गुंफून घेते

आयुष्याची वळण तीच सरळसोट, फुकट अस्वस्थ वाटून घेते

बाहेरचा गोंगाट परवडतो रे, अलगद स्वतःला हरवून घेते

तोच वेळ आता सरतच नाही, लुटुपुटूच्या खेळात रमवून घेते

नवरा म्हणतो काय सारखी सिरिअल्स् बघते, मी फक्त डोळे मिटून घेते !

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...