Friday, July 2, 2010

मध्यरात्रीचे पडघम

मध्यरात्रीचे पडघम, मला तुझ्या मिठीत घेउन जातात

कधी उगवणार आहे ही मध्यरात्र? जशी आज स्वप्नात!

मी ही दचकून जागी होइन, पण कोण कुठल्या जगात?

अद्न्याताचे जपलेले, पुजिलेले प्रश्नांचे संचित, उरे देव्हार्‍यात

घुमेल नाद वेडा, स्वतःची हाक ऐकू येई सार्‍या इंद्रीयात

आता कुठला ताबा, आता पंचप्राण न मावती या देहात

देऊ दे कबूली, की याच क्षणाला, सख्या होती हवी तुझी साथ

गाडली एकांताची उर्मी, घातला होता पाय मळलेल्या सप्तपदीत

पण एकटेच होतो रे, त्या सगळ्या क्षणात...मिठीत...सुखात!

आणि एकटेच असतो रे, जेव्हा मध्यरात्रीचे पडघम वाजतात

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...