दोन प्रकारची माणसं शांत झोपतात. एक ज्यांना स्वप्नच पडत नाहीत अन एक ज्यांची स्वप्नं पूर्ण होतात. माझ्यासारखे काही अर्धवट झोपेत, उठ्ल्या क्षणाला रागात जागे होत, स्वप्नांची भुतं मानगुटीवर नेतात. कधी वाटतं स्वप्नांना आयुष्य आहे. कधी वाटतं आयुष्य हेच स्वप्न आहे! जाग यावी,निसटून जावं.

Friday, July 2, 2010

बेवफा


पाउसही आलाच होता की परवा...तो ही पहिला
तरी तुझी आठवण आल्यावरच ती सुचली...बेवफा कविता !

मी थांबले होते खूप वेळ...बोचरे थेंब झेलत
तरी तुझी आठवण आल्यावरच त्याने भिजवलन्...बेवफा पाउस !

तू नसताना काय भिजायचं...म्हणून उघडली खरं
तरी तुझी आठवण आल्यावर उडून उलट्लीच...बेवफा छत्री !

उशीरापर्यंत एकट कशाला भटकायचं...म्हणून थांबवली
तरी तुझी आठवण आल्यावर सवयीने निसटलीच...बेवफा बस !

थांबले...भिजले..रमलेही...तुझ्या आठवणीत बस स्टॉपवरच
तरी घरची आठवण होताच निघाले रे...बेवफा मीच !

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...