Friday, July 2, 2010

खपल्या


खपतील रे खपतील..

ह्या ही खपतील..

आजवर नाही खपल्या ?

कविताच ना ह्या !

डोळ्यातल पाणी आवर..

आल तरच हं..

तसा कोडगा आहेस..

तरी कवी आहेस..

पण कोडगा आहेस..

लिहितोस झक्कास पण !सुंदर दिसतिल दिसामासाने..

लडिवाळ आरोप प्रत्यारोप..

संधी समास समारोप..

सध्या ओले आहेत..

नाव लिहिलच नव्हतं..

जाहीर सगळ मोघमच..

बिन्धास्त मात्रेत बसव..

पेन्सिलनेच लिहितोस ना..

कसले डँबिस आहोत !

तू.. मी.... शब्द !मी ही वाचेन..

अगदी कसं साळसूदपणे..

आणि हसेनही गालात..

जशी पहिल्या वेळेस..

आठवेल बरच काही..

उगाच बर का !

गेले द्यायचे राहूनी..

असही वाटेल कदाचित..

माझ्यकडून एक 'पण'..

अर्थात निनावि सप्रेम..असेच पडलो ना ?

लिहिता लिहिता प्रेमात..

आणि पडता पडता..

पुन्हा लिहू लागलो..

सौदा फायदेमंद रहा !

वसंत तर वसंत..

शिशिर सुद्धा बहरला..

अशक्य कोटी 'पण'..

नाही जमत एखादा..मला माहित्येय...शेवटी..

'अनुश्री' हे अवघड यमक आहे !

3 comments:

 1. excellent!
  I liked your style in this poem!

  and welcome to my blog!
  me pan marathit lihito kadhi kadhi, kadhi kadhi blogwar pan takto tyatla kahi!

  ReplyDelete
 2. अनु , तुझ्या त्या ब्लॉग टायटल च्या खालील वर्नणामधे व्याकरणात चुक आहे . " वाटत " नाही " वाटतं " लिही. वरील कवीतेत पन 'नाव लिहिलंच नव्हत ' असं आहे . त्याला " नव्हतं" कर. डॉक्टर आहेस . शाहाणी आहेस . फारच छान लिहितेस . असेच लिहित जा . वाचायला छान वाटते. व्याकरणातल्या चुका तपासुन पहात जा. दोन्ही ईन्ज्रजी व मराठीतल्या. मग पोस्ट करत जा. In English don't write small i. Write capital "I".Period is (.) not(.....).In poems it can be ok. But in prose give only one(.) at the end of sentence. You are an excellent writer.You are a Doctor by profession . So no doubt you are a brilliant lady. Keep it up. God bless you.

  ReplyDelete
 3. @prabhakar: thank you so much, toortas chuka durust kelya ahet, pan anuswar denyasambandhee maza baraach gondhal hoto..i ll look into the reference..thanks a lot..keep visiting :)

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...