Friday, July 2, 2010

प्रश्न !!

अरे प्रश्न असा पडतो, की तुला काय लिहायचे?

अजून किती वह्यांचे कागद उगाच चुरगाळायचे !

आधी लिहून ठेवलेल्या कविता देऊ, तर शिळ्या वाटतात

तुझ्यावरच लिहायचं ठरवलं, तर गडबडून शब्दच पसार होतात

मनातलं सांगायचं म्हंटलं, तर मला तरी कुठे कळलयं?

तुझ्या माझ्या आठवणी लिहीण्यासारखं तरी काय घड़लय?

उपदेश करायचं ठरवलं, तर माझाच पोरकटपणा आठवतो

तुझ्या माझ्यात न बोललेला, असा विषयचं कुठे उरतो!

प्रेमावर बोलू म्हंटलं, तर तुझेच हळवेपण भळाभळा वाहायचे

कुणी कुणाला समजवायचे, मग कुणी कुणाला सावरायचे?

डोंगर दर्‍यांवर, वार्‍या पावसावर लिहू तर...हसशील

चिडवू..पण कुणावरून? वर भीती की माझ्यावर उलटवशील

'निरोप' घ्यावा म्हंटलं, तर एवढा दूरही जाणार नाहीस

नंतर लिहू म्हणून राखून ठेवावं, तर माझा उरणारही नाहीस!

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...