Friday, July 2, 2010

असाच जोराचा वारा यावा


असाच जोराचा वारा यावा
माझ्या कवितांचा पाउस पडावा
सगळा आसमंत मुक्तछंद व्हावा
असाच जोराचा वारा यावा

असाच जोराचा वारा यावा
पानांच्या सळसळाटात माझेच गाणे
फांद्याना झुलाया नवे बहाणे
असाच जोराचा वारा यावा

असाच जोराचा वारा यावा
वेळूच्या बनात माझ्या सुरांचे अलगुज
कापूस म्हातार्‍या आल्या कराया कौतुक
असाच जोराचा वारा यावा

असाच जोराचा वारा यावा
भरावे वावटळीत माझ्या डोक्यातले खूळ
दिशांत विखुरली वेड्या कल्पनांची धूळ
असाच जोराचा वारा यावा

असाच जोराचा वारा यावा
क्षितिजात माझे रंग उधळावे
थेंबांनी त्याचे इंद्रधनु फुलवावे
असाच जोराचा वारा यावा

असाच जोराचा वारा यावा
माझ्या चित्रांनी जणू धरावा फेर
मनाला त्याचे 'मी' पण अनावर
असाच जोराचा वारा यावा

2 comments:

  1. वेळूच्या बनात माझ्या सुरांचे अलगुज
    कापूस म्हातार्‍या आल्या कराया कौतुक
    असाच जोराचा वारा यावा...

    aawadali kavita..

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...