Friday, July 2, 2010

सवय


फार काळ उमलू दिलं नाही.. तर
कळ्यान्चीही सवय मोड़ते फुलण्याची
डोळे कोरडे.. तरी आत रडू याव थोडं
सवय नकोच, संयमी सोसण्याची
कुठेतरी उरी.. जरा ठणकतच रहाव
जाणीव भळभळावी, जिवंत असण्याची
कोंडू नये पिसाट वार्‍याने दारा-खिडक्यांमागे
मजा घेत रहावी, लहरी भिरभिरण्याची
असं कसं.. असं तसं... काही ठरवू नये
भरभरून लिहाव, हौस पुरवावी जगण्याची
तुझ्या प्रेमाच.. फक्त निमित्त सापड़लय
सवाय जुनीच आहे, स्वतःशी बोलण्याची

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...