Friday, July 2, 2010

पाउस पडतच राहतो.......

लोकं आपल्या मैत्रिणीला काय काय नौंसेन्स भेटी देतात
तू मात्र मला आवडतोस... तू मला कविता पाठवतोस
माझ कवितांवर प्रेम आहेच, भेट दिलेली आणखीनच भावते
तुझी ही स्पेशल ट्रीटमेंट.. मोरपीस फिरवल्यागत सुखावते
आणि मृदगंध कसा विखुरतो, पहिल्या पावसाला दाद देण्यासाठी
तशी एक कविता मी उत्तरादाखल पाठवते.. फक्त तुझ्यासाठी
मग तुलाही भरत येतं आणि कवितांचा पाउस पडतच राहातो
दिवसभर मनात आपल्या मैत्रीचा सुगंध दरवळत राहातो...

पाउस पडतच राहतो.......
असच काहीसं होत असणार रे आभाळ आणि मातीच्या मैत्रीतही......

2 comments:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...