Friday, July 2, 2010

रात्र चढते तुला..

रात्र चढते तुला..

रात्र चढते मला..

म्हणून ठरवल भेटायचं नाही..

भेटलो तर बोलायचं नाही..

बोललो तर ऐकायचं नाही..

ऐकल तर जपायचं नाही..

जपल तर आठवायचं नाही..

आठवल तर गलबलायचं नाही..

गलबलल तर दाखवायचं नाही..

दिसल तर लपवायचं नाही..कारण तसही..

कुणाला ते कळायचं नाही..

कळल तर झेपायचं नाही..

झेपल तर पटायचं नाही..

पटल तर पचायचं नाही..

पचल तर आवडायचं नाही..

आवडल तर लिहायचं नाही..

लिहिल तर छापायचं नाही..

छापल तर.... छापल !!!व्वा !! अजून एक रोमिओ ज्यूलिएट

अगदी वेगळे पण तितकेच इडियट

Darling, we are so different !

झक्कत म्हणाली होतीस But !रात्र चढते तुला..

रात्र चढते मला..

आणि असेच, शंभर नवे शेक्सपिअर, रोज उगवतात..

अन मावळतात, मुळा मुठेच्या काठी, मराठी सारस्वतात.

काय करणार ?

रात्र सार्‍यांनाच चढते..

रात्र सार्‍यांनाच नडते !

3 comments:

 1. छान कवीता आहे . मला कवीता जरा कमी समजते . खरं सांगु ? कवी किंवा कवयत्रीला काय सांगायचे असते ते त्याला/ तीलाच माहीत असते. सरळ सरळ भाषा असेल तर कुनालाही कळते . वाकडी तीकडी असेल तर ज्याचं त्यालाच कळते . असो . Very good.

  ReplyDelete
 2. भेटायचं, बोलायचं, करायचं. सगळ्या 'च ' वर अनुस्वार दे . च वर आपण जोर देत आहोत . God bless you.

  ReplyDelete
 3. ho kaveecha angle tyalach 100% kalto..
  pan anekarthshakyata ha kavitancha saglyat chan gun ahe...

  hya kavitevishayi bolaycha tar
  hallee aplya emotions cha vent mhanun saglech kavita kartaat..mhanje maza tyala virodh nahi..pan thodyashya uparodhat me hee lihilee...
  ajkal premkavitan madhla surprise element nighun gelay.. rather saglyach dalalelya vatatat...

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...