CXR
त्याच्या इवल्याश्या छातीत
ढगांचे पुंजके पाहिले
आणि आभाळ कोसळण काय असतं हे ही कळलं
आजाच्या कडेवर होता
ह्यातच सगळ उमजलं
त्याला काय झालय हे मी मलाही नाहीच विचारलं
त्याच्या भिजक्या गालांवरुन
माझं अवसान गळालं
उगाच शूरासारखं मग मी स्वतःला नाहीच सावरलं
वॉर्डातल्या मितीत भरून
माझ्या मनात शिरला
तो HIV फिदीफिदी हसला, शिकून मी असं काय मिळवलं?
अजूनही माझ्या मनात,
हा साला कोण 'माणूस' राहातो?
आज पुन्हा एकदा त्याने माझ्यातल्या डॉक्टरला छळलं
No comments:
Post a Comment