Friday, July 2, 2010

Rx


आकाशात चांदण्याला नवा बहर
त्याच्या आठवांचा जालीम कहर

झोपेच्या साम्राज्यात बैचैनीचा अंमल
बेसावध जाणिवांना भलती चाहूल

दिवसघाईत संथ शून्यात वावर
विचारांच्या थैमानात गाण्याची सर

घड़याळयाच्या काट्यांना समेवर दाद
गेल्या वेळाची कुणी ऐकावी फिर्याद

अंतरात चहूकडून रोखलेली नजर
वेंधळेपणाला झाली बहाण्याची भर

कुणा न जुमानण्याइतका स्वप्नांना माज
रेखीव चौकटीना मोडून केले कोलाज

हाय! गुलाबी थंडीत चढला प्रेमज्वर
डॉक्टरच्या दुखण्यावर औषधेच बेअसर !!

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...