Friday, July 2, 2010

vote!


जोडयाने मारल पाहिजे सगळ्या हरामखोरांना..
चार शिव्या हासडतो..
जोराने आपटतो, आदळतो..
जे काही हातात असेल ते..फाईल..रिमोट..ग्लास..
अन निमूटपणे शेवटी गिळून राग..
आपल्याच पोटात आग आग...

माहित्ये कोणीही निवडून आला तरीही..
इथे सगळ जैसे थे..
डोक्यावर नाचणारे वाढता वाढे..
जे काही हातात असेल ते.. हो करतो.. हो होइल..
अन डोळसपणे कर्मवादाकडून कर्मकांडाँकड़े..
हाताच्या रेषावर मन भिरभिरते वेडे वाकडे..

हे सगळ कुणामुळे..
टाळता आली असती का ती पहिली लाच..
पहिल्यांदा रस्त्यावर थुनकताना दाटलेली लाज..
कुटुम्बनियोजनवाल्याँचही ऐकल असत तर बर होत..
झोपड़पटटीयांसारखी फोफावल्ये जबाबदारयांची रास..

हे सगळ कुणामुळे..
मीच उभा राहिलो असतो अजून दोन दिवस रांगेत..
चपराशी, सेक्रेटरींची मखलाशी करायलाच हवी होती ?
वर्षभर जिथे तिथे मतांच्या पिंका टाकत राहिलो मजेत..
मतदानाची सुट्टी मात्र लोळायलाच का हवी होती ?

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...