Tuesday, August 3, 2010

"पुनः प्रत्ययाचा आनंद...इ.इ."

इयत्ता दहावी अ !
त्याकाळी म्हणजे सगळ्या सहाध्यायी पामरांना समजेल असे बोलणे आम्हांस नामंजूरचं !
आता आठवून खूप हसू येतं...
पण खर सांगू, माझा खडूसपणा कधी कधी खूप मिस करते मी..
दूSSर असला तरी शेवटी गुणचं ना तो !

अगं आई गं.. हल्ली माझ्या शाब्दिक कोट्या म्हणजे एखाद्या आज्जीबाईंनी दोरीवरच्या उड्या माराव्या तश्या केविलवाण्या झाल्यात...
म्हणून तर..काल दहावीतली निबंधांची वही वाचून खूप हळहळले..आज्जीने शिवलेली जुनी गोधडी असावी तशी वही गालावर घुसळली..

आहाहाहाहा..

पुनः प्रत्ययाचा आनंद !

वरचे हाहा.. मोजून लिहीलेत हों..कांय समजलात.. हां!
असेच कालिदासाच्या एका सुभाषितातले ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ: पाठ करताना अस्मादिकांची ठंबेरी..अब..फंबेरी..
अहो व्यंजनांचं काय घेउन बसलात..तो काळ असा होता की आमचे आजो आम्ही पाच बहिणी आणि दोन आत्यांना "संजू" या एकाच नावाने हाक मारायचे..घ्या !
नावबिवं म्हणजे अडगळचं की हो..असो..तर ती ठंफं..हां भंबेरी! काय ती उडल्याचे स्मरते.

आणि त्याच ठं ठं च्या कैफात..एका दुग्धशर्करा,मणिकांचन वा तत्सम मुहुर्तावर जुळून आलेल्या शाशा च्या तासाला, मैदानावर जायच्या घाईत..
त्या 'सोपानमार्गेण करोति शब्दं 'चे प्रात्यक्षिकही झाल्याचे स्मरते..

आहाहाहाहा..

पुनः प्रत्ययाचा आनंद ! ते हि नो दिवसा: गता: !


काय झालयं?
हा जुलै खूप नॉस्टाल्जिक होता..
तसा पावसाळा आम्हा कवी लोकांसाठी निसरडाचं !
आठवणींच्या शेवाळ्यावरून कधी ठंठं होईल याचा नेम नाही..

हो ना..मग try this..

छान रिमझिम पावसाळी संध्याकाळी खिडकी पकडा.. हो मुंबईकरांसाठी खिडकी मिळणे, घरातली असली तरी, चैनेचीच गोष्ट..

ते जाउ दे, तर छान रिमझिम पावसाळी संध्याकाळी खिडकी पकडा
आणि चहाच्या वाफेवर तरंगता तरंगता..
हरवून जा.. नॉस्टाल्जियात !

काय? हल्ली नॉस्टाल्जियात पूर्वीसारखं 'नाविन्य' राहिलं नाही म्हणता.. :)


p.s . for those who wanna get hang of that 60s or 70s or 80s time
मोफत सल्लाकेंद्र, at your service..
based on my experiences this season, heres what u should try...

'कर्‍हेचे पाणी' वाचा.. हल्ली पूर्वीच पुणं राहिलं नाही हा निव्वळ वाक्प्रचार आहे बरं !

'सूर्याची पिल्ले' बघा, कानिटकरी फार्साची गंमतचं न्यारी!

आवडती पुस्तके पुन्हा वाचा, मी वाचलं माझं all time favorite.. 'नाथ हा माझा'..त्यात ७० आणि ८० च्या
दशकातले छान संदर्भ आहेत.

एखादा जुन्या गाण्यांचा कार्यक्रम ऐका..मी ऐकला..बाबूजी आणि रफींचा..

ह्रुशिकेश मुखर्जींचा एखादा सिनेमा बघा..मी पाहिला..मिली !

शाळेतल्या किंवा जुन्या वह्या चाळा, आजोबा-आज्जींचे फोटो बघा..

जुन्या पाठ असलेल्या कविता म्हणा...खूप मज्जा येते..

कालचं आमच्या समोरची सारिका आणि मी 'येगं येगं सरी..' ची जुगलबंदी केली..
ती छोट्या शिशूत आहे.. :) we are window friends !

आणि एक गोष्ट नक्की करा..जी मीही अजून करायची बाकी आहे..पण या पावसाळ्यात नक्की करणार आहे..

कागदाची होडी करून, तिला पाण्यावर सोडून हळूच फुंकर मारणे !

त्या वेळी मनात जे काही दाटतं ना..that is magical, beyond words !

happy monsoon !


12 comments:

 1. kya baat!
  bara mokali zalis jara..
  sandarbh ani to do list mandalya baddal khup khup dhanyavaad..
  talya tar aaiku yenar nahit ni tikde..

  ReplyDelete
 2. :) punekaranchya comments hi daad denyasarkhya astaat..

  ReplyDelete
 3. शाळेतल्या किंवा जुन्या वह्या चाळा, आजोबा-आज्जींचे फोटो बघा..

  जुन्या पाठ असलेल्या कविता म्हणा...खूप मज्जा येते..

  त्या वेळी मनात जे काही दाटतं ना..that is magical, beyond words !

  .....NICE ONE!
  (THIS IS STRICTLY NOT NEGATIVE.. THIS GA STYLE :-))


  प्रेमाने जोपासलेला लाल डोळ्यांचा पिवळा पक्षी अखेर माझ्या तळव्यावरच आडवा झाला व त्याचे अंग एकदम हलके निर्जीव झाले. त्या लाल डोळ्यांनी मोकळे निळे आभाळ व हिरव्या पानांतली काळी गोड फळे पाहिली होती. पण आता त्यांच्यावर पातळ पडदा पसरला आहे. मी त्याला परसातच सोडले व त्यावर एक फुलझाड लावले.

  काही दिवसांनी त्यावर एक जांभळे शालीन फूल उमलले. परसातील सगळ्या केवळ हिरव्या रंगाचीच एक जुनी आठवण जागी झाल्याप्रमाणे ते मखमली दिसत होते. लाल डोळ्यांच्या पिवळ्या पक्ष्याला निळ्या आभाळाची व हिरव्या पानांतील काळ्या फळाची आठवण होती व जांभळ्या फुलाला पिवळ्या पक्ष्याची आठवण होती.

  एक दिवस ती भेटायला आली. ती त्या फुलाजवळ उभी असता मी तिला पिवळ्या पक्ष्याविषयी सांगितले. तिने ते फूल खुडून केसांत खोचले व ती गजबज डोळ्यांनी निघून गेली. नंतर मला ते घर सोडावे लागले. परसू दूर राहीले, परंतु निळे आभाळ पाहिलेल्या लाल डोळ्यांच्या पक्ष्याची आठवण जांभळ्या फुलाला होती.

  ती निघून गेल्यावर तिची आठवण मला आहे. कधी तरी कातल्या वेळी मला देखील ते मातीचे मोठे घर सोडून जावे लागणार आहे. हे सारे माझ्या आठवणीत आहे व माझे मन घुंगुर झाले आहे. मी गेल्यावर त्या साऱ्याची आठवण कुठे राहील का?

  राहावी ! राहावी !! राहावी !!!


  THIS MIND IS SO POSSESSIVE!

  ReplyDelete
 4. kewilnya udichi matra kahi farshi lagu padali nahiy. Fakt dori war udya maranarya ajjibai, kathi ghreun punha udya maryala laglyat ase watate..:-)


  Beauty ashi asate
  परसातील सगळ्या केवळ हिरव्या रंगाचीच एक जुनी आठवण जागी झाल्याप्रमाणे ते मखमली दिसत होते.

  can u see it.. feel it...?

  ReplyDelete
 5. @ yogesh, thanks..

  @ me.. ह्या ओळींत आणि माझ्या शब्दात तितका फरक आहे, जितका लहानपणीची दिवेलागणीची वेळ आणि काही पावसाळ्यान
  नंतरची अनामिक हुरहूर लावणारी सांजवेळ...घुंगुर...GA चे शब्द मला वेड करतात..

  i can see their beauty..

  pan tyanchya javal asnaara ayushyacha anubhav nahee..

  'तो' नाही...

  i wonder if i will ever fall in love and write something painfully beautiful like that...

  जख्मे जिगर की कमी है !

  ReplyDelete
 6. aani pingalawel ya shabdacha aarth?
  jenhwa ratr sampli asate pan pahaat zali nasate, , pahat hoil ashi shahwati watawi ashi konatich khun disat nasate...wara nahi.. haalchal nahi..fakt ek wilaxan stabdhata..thats called pingalawel!

  may be words different asatil...Pingalwel pustakat wachale asel kadachit.. BTW GAn che pustak wachun ata 5 - 6 warshe zali..shabd,wakye,katha wisarlya.. farase kahich mage rahile nahi....pan to wachatanacha anubhaw nahi jaat!
  -----------------------------------
  love is a feeling wherein u assume that u won't get better..so cling on to this..:-).So pain of love vanishes when u get a better thing than for what u were ready to die for. so love won't help u :-)

  It's ur choice that can help u write as beautiful as this! Do u wan't have a closer look at the truth or u wan't be a butterfly on flowery roads....this choice u will have to make:-)

  ek dola band karun shobhadarshi madhe lahan pani pahilelya naxi itakech satya abhasi asate..:-) asatya asate... pan te tyacha pathalag kelyawar kalate ani flowery roads mage sutale asatat...pingalawel waigare sarkhe saundary janmala yete hya asahayy pan aniwary xani!

  ...so better if you can linger in those lushes..:)

  or ....

  Let me take you down, 'cause I'm going to Strawberry Fields.
  Nothing is real and nothing to get hung about.
  Strawberry Fields forever.

  ReplyDelete
 7. Hmmmmm july samplaay, pan paus ajun bakee ahe hodya / kagdee shirt vagaire karun pahato jamle tar nakkich :D Thanks Anushree good one. thoda ghait e savistar commentto nantar :D

  ReplyDelete
 8. @ me..yeah, u are right about love :) but thats exactly what kills me..i wanna see somebody become indispensable for me, once !

  about writing,i m much in love with flowery roads as with strawberry fields..
  thanks for d song btw...

  i have only read pingalavel..and i loved Orpheus and swami...but other stories have a pattern and i felt disappointed...
  still he is my fav..
  hope i get time to read him through..

  ReplyDelete
 9. >>>>>but other stories have a pattern and i felt disappointed...
  that's called writing the same story over and over again.. every time trying to cut nearer the aching nerve!


  >>>>>i wanna see somebody become indispensable for me, once !

  fans are hard to get :-)

  ReplyDelete
 10. nah, there are many different aches in this world..each has its own beauty...and i would have loved to see him make beautiful paintings out of each of em...

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...