Monday, September 13, 2010

भावे ओवाळीन..

आयुष्य किती निरर्थक आहे आणि श्रद्धा किती फसवी,
याची जाणीव सतत मनात ठेवून कोणी सुखात कसा जगू शकेल ?
फार दुबळे असतो रे आपण ..
अगदी माझ्यासारखी माणस पण..
मनस्वीपणे जगून आपण निरर्थकपणावर कशी कड़ी केली , अश्या विभ्रमाच्या कुबड्या घेत जगतात ...
मृत्यू आणि प्रेम झाल्यावरच, खरी अगतिकता कळते ..
आणि तिलाही आपण टाळतोच की ...

कुठलीही श्रद्धा किंवा आशा न ठेवता जगण्याची माजखोरी मला खूप आवडते..
पण मलाही लोकांना श्रद्धापुर्वक पूजा करताना पहायला खूप आवडत...
खूप छान वाटत आणि खूप असूया पण ..
कारण सगळ्या गोष्टींचा कार्य-कारणभाव आपण स्वतः आहोत हे मान्य केल्यावर खूप एकट वाटत..

म्हणजे लहानपणी हरताळकेच्या रात्री मेंदी पुरी होइतो मध्यरात्र उलटून गेलेली असायची..
अश्यावेळी निजताना मंद दिव्यात ध्यानस्थ बसलेल्या बाप्पाची किती सोबत वाटायची...
आता कशाचच काही वाटत नाही..
आपण नास्तिक कधी होतो ?

गावातले रस्ते लहान होतात..आपण मोठे होत जातो..परवा आग्रा रोड क्रॉस करताना आठवल, कशी हात सोडून पळाले होते..आणि एका डॉक्टरच्याच गाडीवर जाउन धड़कले होते..बिच्चारा :)
अजून ती खुमखुमी तशीच आहे..पटवर्धन डॉक्टरांचा बोळ पण...पण आता 'ती' भीती नाही...कसलीच नाही..
कसलीच भीती नाही म्हणून क़ा कशावर श्रद्धाही नाही ?

आपण नास्तिक कसे होतो ?
परवा आईलाही हा प्रश्न विचारला.. तिलाही नेमक सांगता आल नाही अन मलाही..

सालाबाद प्रमाणे यंदाही असा गणेशोत्सव सगळीकड़े खूप उत्साहात साजरा होत असतो..
आरती संपायला आलेली असते..तसही माझ्या आणि बाप्पात बोलण्यासारख काहीच नसत...आयुष्याच्या धकाधकीत दुरावलेल्या बालमित्रासारखे तटस्थ एकमेकांकडे, पण शून्यात पहात असतो..आताशा खिरापत, प्रसादाचा बुफे आणि फुलांचा बुके झाल्यापासून, काही कामही नसत..
मला जुन्या चाळीतल्या गमती-जमती आठवून हसायला येत..सगळे आपापला वशिला लावण्यात दंग असतात...नकळत मीही सवयीने मंत्रपुष्पांजलि म्हणत असते..
आजी खूप वेळ डोळे मिटून तशीच हात जोडून बसून राहाते..तिची श्रद्धा आणि आमच्या नास्तिकत्वाचाही भार जपत...मला भरून येत..निरांजनाची उब हातात घेउन डोळे झाकावेसे वाटतात..किती दुबळे असतो रे आपण..

12 comments:

 1. आपण नास्तिक कसे होतो ?

  i don't know but i think as we grow up arrogance grows bigger luckily if u r successful on your own means then its really hard to make space for GOD in your goodbooks.

  but this is only wid weaker ppl or lesser men,with more knowledge n power men became more humble

  ReplyDelete
 2. अनुश्री, मला नाही वाटंत कि आपण नास्तिक होतो....फक्त मोठे झालो कि माणुसकीचं महत्व कळतं...आणि उमजतं कि देवाची खरी भक्ती म्हणजे माणसाने माणसाशी माणुसकीने वागण्यातच आहे. नाही का? मग नाही गरज उरत रोज मंदिरासमोर रांग लावायची आणि अर्धा अर्धा तास पूजा करण्याची... असं आपलं मला वाटतं.... :)

  ReplyDelete
 3. Solidch lhilayas ga ekdam..!
  Actually aapllyala Nastik hoycha nasata,, paan attachya yugani aaplyala nastik banavlay, ani saddhyche he appan Middle class kiva tyachya varche lok jastit jasta nastik banat challiyat.. atta Ganpatichya pahilyach divshi amchya sociteytitla kivha baresche aaplya sarkhe loka Ganpati aanychi pratha just chalu thevlei pahije mhanun anatat ani kon gaditun gheun yeto kivha koni Mhatare aaji ajoba dogech gheun yet astat,tyat suddha aajine ganpati uchalela.....paan tya ulat aaplya areatla Bhanjevaditla Ganpati .. kai jabardast nachat gajat yetat ganpati gheun full jalloshat, maja yete baghayla..!

  ReplyDelete
 4. thanks sahil, anagha, malhar..your point of views have added more to the post.. :)

  ReplyDelete
 5. आयुष्य किती निरर्थक आहे आणि श्रद्धा किती फसवी,
  याची जाणीव सतत मनात ठेवून कोणी सुखात कसा जगू शकेल ?
  ---> wow!

  मनस्वीपणे जगून आपण निरर्थकपणावर कशी कड़ी केली , अश्या विभ्रमाच्या कुबड्या घेत जगतात ...
  ---> wow, wow!!

  कुठलीही श्रद्धा किंवा आशा न ठेवता जगण्याची माजखोरी मला खूप आवडते..
  ---> wow, wow, wow!!!

  गावातले रस्ते लहान होतात..आपण मोठे होत जातो..
  ---> wow, wow, wow, wow!!!!

  आजी खूप वेळ डोळे मिटून तशीच हात जोडून बसून राहाते..तिची श्रद्धा आणि आमच्या नास्तिकत्वाचाही भार जपत...
  ---> wow, wow, wow, wow, wow!!!!!


  mala watale hote tu एक नवोदित कवयित्री ahes ..:-)

  ReplyDelete
 6. आयुष्य किती निरर्थक आहे आणि श्रद्धा किती फसवी,
  याची जाणीव सतत मनात ठेवून कोणी सुखात कसा जगू शकेल ?..
  ----->>>>
  मनस्वीपणे जगून आपण निरर्थकपणावर कशी कड़ी केली , अश्या विभ्रमाच्या कुबड्या घेत जगतात ...
  satyala janun ghenyachi bhasha karanare hyach maleche mani.

  आपण नास्तिक कधी होतो ?
  jenwha bhiti marte tenhwa? ki jenwha swatahachya wicharanwarcha wishawas wadhato tenhwa?
  ...
  ...
  hya jagat dev asala tari to hya nirarathkatechach ek bhag asanar ahe hyachi janiw hote tenhwa?
  ki anantwachya kalpanechi asamarthata hech te ekmew widaarak saty .... hyachi janiw zalyawar?
  ...
  ...
  ki nastikata ha lahanpani manawar zalela ek sanskar ahe?

  ReplyDelete
 7. khup diwasani ek chhan blog wachala..:-)

  ReplyDelete
 8. hey vikram, all valid theorems.. but i think astikpana ha rather, janmapasun suru honara sanskar ahe... passively absorb karat gelela, nastikta titkya sahaj bhinte as mala vatat nahee..
  Btw sadhya G.A. vachat hote, tyanchya kathet var var sarvatra astiktechach sanchar ahe..prateeke ahet..quite paradoxical...

  ReplyDelete
 9. Aaplepan (apulki) asna mahatwacha !
  Mag ti ekhadya murtivishayi,manasaan vishyi, prani / zadanvishyi!
  Mala vatata apulki tun vishwas ani shraddha nirmaan hotat!
  Jeva he aple pan kami hota kinva jaataa teva goshtinvarcha vishwaas ani shraddha hi nai oorat:Ani tevach mala vatata Nastikate chi sankalpana roojte.

  ReplyDelete
 10. Anu kiti chaan lihites..Khupach sundar.. Agdi nirmal manane ani simple thoughts itke sahazpane shabdat maandles.. I'm sure ha thot aplya saglyanchya manat nakki dokavto kadhi tari.. Aaz tuzhi Aai (mazhi avadtee vyakti), azunhi proud zhali asel tyzhyavar.. Bappanchi nemhi tyzhyavar prem n krupa rahavi hi Tyanchya paayee prathana thevte.. Loads of love kisses n wishes for u..
  Tuzhe mantle shabdat vachnya saathi aatur zhale.. Ashich chaan chaan lihit za..

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...