Monday, September 27, 2010

थांग..काल इतक्या हलकेच तू मिठीत घेतलस,

काचेचा तो हळवा कोपरा,

जीवापाड जपण्यासारखं असं सगळं आणि तितक्याचं अलगदपणे त्यांच कोसळणं..

अज्ञाताने मारलेल्या फुंकरीने अस्वस्थ थरथरणार्‍या आगीसारखी,

पण काहीशी आजच्या धसमुसळ्या पावसासारखी, मुसमुसत राहिले..

आधी 'तो' आठवला आणि त्याला इतक्याच आश्वासकपणे कुशीत घेतल्याची आठवण..मग काही कारणं..

बाकीचे बेवारशी हुंदके होते..आणि मोडण्याच्या शंकेने भेदरलेली स्वप्नं..

तू सगळ्यावर हात फिरवत राहिलास, शांतपणे थोपटत..

शेवटी तुझ्या या समंजसपणानेच भरून आलं.. किती वेळ असा ओलीस होतास कोण जाणे?

ती अनाहूत अशी थंड लहर येईस्तोवर कदाचित..

एका विलक्षण शांततेत लपेटून गेली...

तुझ्या नकळत तुझ्यासाठी नसलेल्या, मी उमटवलेल्या या ओरखड्यांनाही, आपलेच म्हणून जपशील ना?..

तुझ्याकडे बघेस्तोवर ओठांची अस्वस्थ हालचाल तेवढी उरली....

पण तुझ्या चेहर्‍यावर प्रश्नांचा मागमूसही नव्हता..

तुलाही तिची आठवण येते का रे?

आणि असहाय्यपणे हसूच आलं !

तूही उगाच बेफिकीर हसलास..

आणि त्या क्षणावर सुखाचा तवंग पसरला..

त्याला सहज नजरेआड करत, अनिश्चिततेत झोकून देत,

एकमेकांत गुरफटत, अंधार आणि तू, मी, लुप्त झालो...

3 comments:

 1. ratr tar sarun jail.. diwasache kaay?
  bocharya prakashat , hajaro papanya nasanare rokhalelya dolyanchya gardit asech befikiriche hasy umatu shakel?
  ratri wahnare sheetal ware asayyatechya jaltya jakhmewar funkar ghalattil. pan diwasa ase ware wahat nahit. janawate ti ekmekanchya jalnarya jakhmanchi zal.
  ...pan dole band keli ki andhar :-). karu shaknare ka tya pandhrya parakashakde path?

  ReplyDelete
 2. comment khali lihayala wisarale

  ... swair

  (hahahaha)

  ReplyDelete
 3. malahi hasav ka radav te kalat nahiye !

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...