Friday, October 1, 2010

ही गद्धेपंचविशी !

गद्धेपंचविशी..अर्थात, गाढवपणाचे रौप्यमहोत्सवी वर्ष !

आता इतक्या सहज जमणारी गोष्ट साजरी करण्यासाठी, एवढी वर्ष कशाला वाट बघायची!

अशा सूज्ञ विचारांती, तसा माझा यथेच्छ गाढवपणा करून झालेला आहे म्हणा..

वर आयुष्यात इतकी मनसोक्त मज्जा करुन झाल्ये..

की आज शेजारचे अण्णा..'विठ्ठला पांडुरंगा' म्हणाल्यावर..

माझ्या बत्तिशीतून अभावितपणे( वास्तविक अभाविक(!)पणे म्हणायला हवं :)

'उचला आता' अशी चरणपूर्ती झाली...

म्हातारा काय उचलला..आपलं..उचकला म्हणून सांगू !

त्यांच्या बायकोची पण मागे एकदा अशीच चिडून इडली फ्राय झाली होती

(वास्तविक भेजा म्हणायला हवं..पण ते सुद्धा आमच्यातले म्हणजे 'ह्या'तलेच..

तेव्हा नसती फोडणी नको, कसें? :)

का, तर मी त्यांना 'अण्णी' म्हणून हाक मारली म्हणून !

त्यांची नात त्यांना 'करंजी' हाक मारते ते मात्र चालतं..

मग मीच काय गाढव..आपलं..घोडं मारलयं, तो विठूरायाच जाणे..

सारांश काय, तर आता इतक्या सहज जमणारी गोष्ट साजरी करण्यासाठी, एवढी वर्ष कशाला वाट बघायची!पण आता थोडेच महिने उरलेत, पंचविशीत पदार्पण करायला..तर एक वेगळीच हूरहूर वाटायला लागल्ये..

आता 'गाढवपणा' हा ऑफिशिअल अजेंडा असल्यावर..

येत्या वर्षी अजून काय आगळी(क) गंमत करता येईल..

यासंबंधी योग्य मार्गदर्शन हवं..!म्हणून आधी जाऊन डॉ नाडकर्णींचं 'गद्धेपंचविशी' आणलं...

हल्ली वाट्टेल त्या विषयावरची सेल्फ हेल्प बुक्स असतात..आणि ती खपतातही !

पण नाडकर्णी सायकिअ‍ॅट्रिस्ट असले, तरी हे पुस्तक 'त्या'तलं मुळीच नाही..

विशीतच प्रचंड आवडलेलं हे पुस्तक मधल्या काळात नजरेआड झालं

आणि हरवलचं...

त्याकाळातल्या घायाळ (!) करणार्‍या इतर गोष्टींसारखं...

आणि आवृत्ती संपल्याने माझे सगळे प्रयत्न इतके दिवस,

'हा क्रमांक अस्तित्वात नाही'.. ऐकून,

निराशा खुळखुळवत, माघारी येत होते.पण आज किस्मत चमक्या !

'च' चम्या मधला, चमच्यातला म्हणजे आमच्या चमच्यातला नाही,

चपातीवाल्यांच्या चमच्यातला !

'चपला पडणारेत एक दिवशी ' असं

माझ्या आगाऊपणाबद्द्ल आईच प्रांजळ मत आहे !

तशी माझ्या संदर्भात लोकांची बरीच मतांतरे आहेत,

आणि अस्मादिकांच्या गाढवपणामुळे त्यात रोज नवी भर पडते आहे..

एकंदरीत पुढल्या वर्षीची बरीचशी तयारी आगाऊच झाली म्हणायची !असो,

नाडकर्णी म्हणजे आपला फेव्हरिट..

आणि पुस्तक अप्रतिम आहेच.. पण जी गोष्ट वाचण्यासाठी मी खरं तळमळत होते..

ते शब्द आहेत अर्पणपत्रिकेत...

आणि लिहीणार्‍याचं नाव वाचून (जमेल तितकी :) उडालेच !

अधून मधून वाचनात येणार्‍या संदर्भांतून आणि कवितांमधून छळणारा..

चक्क प्रिय पाबलो !

पहिली संधी मिळताच त्याला संपवायचा असं ठरवलेलं...

पण मग राहावेना, म्हणून मिळतील त्या कविता अधाशासारख्या वाचून काढल्या...


How terrible and brief my desire was to you!
How difficult and drunken, how tensed and avid.


किंवा

I have scarcely left you
When you go in me, crystalline,
Or trembling,
Or uneasy, wounded by me
Or overwhelmed with love, as
when your eyes
Close upon the gift of life
That without cease I give you.

My love,
We have found each other
Thirsty and we have
Drunk up all the water and the
Blood,
We found each other
Hungry
And we bit each other
As fire bites,
Leaving wounds in us.

किंवा

I am not jealous
of what came before me...

Bring them all
to where I am waiting for you;
we shall always be alone,
we shall always be you and I
alone on earth,
to start our life!

किंवा

And I in these lines say:
Like this I want you, love,
love, Like this I love you,
as you dress
and how your hair lifts up
and how your mouth smiles,
light as the water
of the spring upon the pure stones,
Like this I love you, beloved.

काही आवडल्या, काहींसाठी आता ते वय नाही असही (संधि)वाटलं!

आणि काहींनी साफ निराशा केली..

पण कम्युनिस्ट कवींची, प्रेमात..शेती-भाती, ब्रेड-पाव, पालापाचोळा घुसवायची खोड ठाऊक असल्याने

विशेष नवल वाटलं नाही..

त्यामुळे बिनशर्त माफी!

कारण तसही काहींचे शब्द इतके घायाळ करून जातात की त्यांच्याकडे जीव गहाण पडतो तो कायमचाच !

का कुणास ठाऊक पण...इतक्या वर्षात जे जे जीवापाड जपण्यासारखे क्षण वाट्यास आले..

त्यांची मुळं त्या त्या वेळच्या गाढवपणातच आहेत !आणि कुणीतरी आपल्यासाठीही असे जीव गहाण टाकून मिळवलेले शब्द जपून ठेवत असेल,

ह्या विचाराची धुंदी अजून उतरलेलीच नाही..

कदाचित उतरणारही नाही..

शुद्ध गाढवपणा !

I want to do with you;

what spring does...

...to the cherry trees-Pablo Neruda

4 comments:

 1. he gaddhepanchvishi ahe k
  Gaddepanhvishi?
  ani tyachakhara arth/ relevance kai?

  ReplyDelete
 2. areechya...Gaddepanhvishi...he kay buva...puneri pavasasarkha danaka detay vatata...kabool karnyat risk ahe pan..nahi kalala...
  gade chya dudhat pani astaa...tyachyashi kahi connction nahi na?

  ReplyDelete
 3. mastach ahe.....it's a time wen everybody likes to freeze the age........

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...