Tuesday, January 25, 2011

विराणी

हल्ली कुणी मोठा माणूस गेला की जो काही सामुदायिक टाहो सुरु होतो.. तो नकोसा वाटतो.

दुःख किती खाजगी गोष्ट आहे.

चारचौघांनी मिळून केलं की दारूच्या पार्टी सारखं नुसतं फैशन स्टेटमेंट वाटतं.

तसही कुणी गेलं की जे काही पंक्तिप्रपंच सुरु असतात, त्यात मला आलं तर हसायलाच येतं..

आणि दोन्ही भावमुद्रा सारख्याच असल्यामुळे ते लपवावं लागत नाही, हे बरं !


तो क्षण येतो कधीतरी.. ज्यात एखादं दुःख पूर्णपणे आकळतं..

त्या आधीचं सगळ झूट वाटावं, असा..

माझे आजो गेल्यावर, अख्ख वर्ष गळक्या नळासारखं काढलं...

पण त्या एका दिवशी, हॉस्पिटलला जाताना.. अचानक जे उमळून आलं...

छे.. मी खूप स्वार्थी आहे...मी नाही सांगू शकत..

असं दुःख.. you have to earn it !सो.. पंडितजी गेले तर गेले....जायच्या वयात गेले..

हवेहवेसे असताना गेले..यंदाचा सवाई ऐकून गेले...

असं सध्यातरी वाटतय..

बघू.. करेन शोक कधीतरी..पण मनापासून..with all due respect !काल रडायला मात्र आलं...

पण ते गाण्यामुळे...

Actually त्यांचा स्वर ऐकला..आणि गुरुद्वाराच्या लंगर मधे जेवल्याची आठवण झाली..

त्यावेळीही अगदी असचं वाटलं होत...

कफल्लक.. भिकार्‍यासारखं..

पण आश्वस्त..

डोक्यावर हात असल्यासारखं..

बापाच्या बापाचा..

Image:http://farm1.static.flickr.com/118/284660943_31798cbe47.jpg

3 comments:

 1. agadi kharr....
  mazi shappath.
  kadhi kadhi dukh itak absolute asat ki te vyakt karavas vaatat nahi karan tyaach ABSOLUTE asan jagacya samor kavadimol tharel mhanun...

  ReplyDelete
 2. hii... an irrelevant comment.. but I couldnt resist myself from sharing your blog intro with all those who dnt understand marathi on my blog!!! with all credits to you ofcourse!
  :)

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...