Sunday, March 27, 2011

फिर छिडी रात बात फूलों की...

आज खूप दिवसांनी तो आणि मी एकदमच बाहेर पडलो..

असं होतं ना, तेव्हा आदल्या रात्री खूप पाउस पडलेला असतो बहुतेक करून..

आणि मी त्यातलेच थोडे सुट्टे शब्द खिशात टाकून बाहेर पडते.

आणायचा असतो साधा चहा ,पेपर आणि दिवस पेटवण्यासाठी काही तरी पोहे-बिहे..

पण चेहेर्‍यावर अश्वथाम्यासारखे भाव येत असावेत.

असेलही, कोणी बघितलाय तो काळा की गोरा ते..

पिवळाही असेल कदाचित..

आतून भगभगत असणार मा़झ्यासारखा..

आता तर त्याची गोष्टही आठवत नाही.

का घाबरायचो त्याला..?

कपाळावर ज़खम असलेल्या माणसांना घाबरायचो हे मात्र नक्की..

माझ्याकडेही बावचळल्यासारखे पाहात जातात लो़क..


इन्स्टिंक्ट्

किती विलक्षण गोष्ट आहे ना..

का, ते कळलं नाही तरी कशाला भ्यायचं, ते एका द्रुष्टिक्षेपात आकळतं..

अदभुत!खरचं..किती दिवसांनी तो आणि मी एकदमच बाहेर पडलो..

कालही खूप पाउस झाला..या गावात हे आक्रीत पहिल्यांदाच..

कारण काल ती इथे नव्हती..

ती अमर्याद आहे...

ती..

तिचं सगळेच ऐकतात..

ती..

ती काय पावसालाही झोपायला लावते निमूट्पणे..

पण काल ती इथे नव्हती..

क्षितीजा पलिकडल्या गावात लोकांनी तिचा अंमल झुगारून दिलाय अशी हूल उठल्ये कालपरवापासून..

म्हणून तडकच निघून गेली..

ती..

ती अमर्याद असायला हवी..

ती..

काल ती इथे नव्हती.

म्हणून हे आक्रीत.. या गावात पहिल्यांदाच...पहिल्यांदाच पाहिलं मी त्या झाडांना बहरलेलं..

पिवळ्या धम्मक फुलांनी....

रस्ताभर..नुसता खच..

धगधगत्या फुलांचा...

मी नुसती पहातच राहिले..


हं, तसं मी कालच लिहील होत त्याला, की आता एकदा पिवळ्या फुलांच्या शेतात जाउन यायला हव..

माझ्याकडची स्वप्नं आणि रंग संपत आलेत..

तिला ही द्यावे लागले नं..

ती..

थोडेच दिवस पुरतील आता जेमतेम..

पण आता निघायचच आहे म्हणा...

आणि प्रवासात कशाला हवय नसतं ओझ

त्यानेच तर नाही ना पाठवली?

पण मी तरी अजून कुठे पाठवलाय निरोप..


तो ही अमर्यादच आहे म्हणा..

पण त्याचा रंग वेगळाच आहे आणि स्वप्नं ही...

स्वप्न तर नाही ना...


काल पर्यंत तर ही झाडं आचरटासारखी हिरवी होती..

हं म्हणजे रस्त्याच्या कडेला थोडी फुलं असायची पडलेली...

पण कोमेजलेल्या फुलांचे रंग थोडी ओळखू येतात...


कदाचित.. फ्रिजमधे काल जास्तीची उरलेली एक दोन स्वप्नं होती.. त्यातलं असेल..

मित्रमंड्ळी आम्ही एकत्रच जेवतो बर्‍याचदा..

कालही..

त्यांना माहीत असेल म्हणून फोन केला तर झोपेत...


असेलही स्वप्नं, म्हणाला त्यातला एक जांभई देत...

म्हणून लगेच संपवायची घाई नको हं...

आम्ही येईपर्यंत थांब जरा...


मं मी फिरत राहिले...

त्या रस्त्यावरच्या एक एक झाडापाशी थांबत...

विस्फारून न्याहाळत...

ती पिवळी धम्मक फुलं...लाखो...लाखो...

माझ्या मोकळ्या केसांतही अलगद येत होती अधून मधून......

आक्रीतच हे...

रस्ताभर..नुसता खच..धगधगत्या फुलांचा...

पिवळ्या धम्मक फुलांनी..झाडं बहरलेली...अजून कसं कोंणी येत नाही...

डोळे मिटून जागं व्हायचा प्रयत्न करून पहायला हवा...

आणि त्याला हे कळवायला हवं..

आता समुद्रावरच जाउ...

ते जास्त आवडेल त्याला..

त्याच्यासारखाच, अमर्याद...तो..तिने हटकलं ना..

ते ही चांगलच भगभगीत हसून...पिवळ्या धम्मक फुलांसारखं....

खूप वेळ मिटलेले डोळे मिचकावत मी मागे सरले...

त्या सरशी तिने एका फराटयात समोरची फुलं कडेला लोटली..

आणि सराईत पणे टोपलीत भरली..

पुन्हा तिचा भगभगीत चेहेरा पाहाण्याआधी जरा प्रकाशाचा सराव करावा म्हणून वर नजर वळवली तो..

झाड टक्क हिरव झालेलं..एक..दोन..सगळीच...

आता माझा चेहेरा बावचळलेला असणारं..

कारण तिचा चेहेरा बोलायला उत्सुक होता..

थोडासा हिरवा...


का एवढी साफसफाई ?..ती आज परत येणारे का ?

ऱोजचच हाय सारं...ती उगाच गडद होत होत दिसेनाशी झाली...


आता सगळा रस्ता नको तेवढा ओळखीचा...

फक्त रस्त्याच्या कडेला थोडीशी फुलं...

पण त्यांचे रंग ही कुणालाच ओळख देईनासे..

तिच्या येण्याची सावली पडल्यामुळे कदाचित..आपल्याला जे हवहवसं वाटत होतं...त्या सार्‍याचा खच पडला होता आज...

मं मी पुन्हा कफल्ल्क कशी...?

माणसं कशालाही भितात...

कपाळावरच्या जखमांना..

ल़ख्ख जागरणं करणार्‍यांना..

स्वप्नांना...

पिवळ्या धम्मक फुलांना...

हो..

पिवळ्या धम्मक फुलांना...

इन्स्टिंक्ट् ...आता तरी डोळे मिटावे म्हणून पुन्हा त्याच्याकडेच पाहिलं...

आज खूप दिवसांनी तो आणि मी एकदमच बाहेर पडलो..

या गावात पहिल्यांदाच...

म्हणून हे आक्रीत..

माझ्या चेहेर्‍याचा रंग उडालेला दिसतोय..

त्याच्या हसण्यातही आता चाहूल आहे..

पिवळ्या धम्मक फुलांचीimage: http://seankane.wordpress.com/tag/flowers

Sunday, March 20, 2011

vanishing valentine

And when in lonely separation we be,

sunlit mornings turn gloomy to me,

And i walk alone in the evening rain,

quietly hiding my solitary tear, and infinite pain


credits :

poetry: pranab da
http://scepticemia.com/

image: http://www.girlwithcamera.ca/wp-content/uploads/2008/08/_mg_7223-725.jpg

Saturday, March 5, 2011

अनिकेत
मध्यंतरी एका मित्राशी गप्पा मारताना घराचा विषय निघाला..

माझ्यासाठी 'घर' अशी काही concept नाहीच आहे.. असा काहीसा सूर लागतो अशावेळी..

But the thought has been lingering for quite a while now

and heres a description,

close to what i feel is my home..

not necessarily existential...but yeah..close..हौशीने जमवलेली रंगीबेरंगी, अवांतर आणि अभ्यासाची ढीगभर पुस्तकं...

त्यात पानोपानी विखुरलेल्या बुकमार्क्सवर, ग्लिटराईझ्ड..

कविता आणि quotes..

स्वतःला आणि इतरांना लिहीलेल्या शेकडो चिठ्ठ्या चपाट्या...

भिंतीवर.. चिकटवलेली, pinned down, रंगवलेली..

असंबद्ध स्वप्नचित्रं .....

आणि त्यात हटकून येणारी, दोन्ही हात पसरून, आकाशाकडे पाहाताना हरवलेली,

एक कुरळ्या केसांची मुलगी..


आजोंचा आणि मी आई बाबांचा फोटो...

dimond studded timepieces...

सशाचं चित्र असलेला एक प्लास्टिकचा तुकडा...

एक जुनाट स्विस फ्रैंक आणि स्विस chocolates चा एक रिकामा डबा ...

आणि त्या डब्यात जपलेले..

भन्नाट मित्रांबरोबरीच्या अफलातून evenings चे souvinirs...


आणि भोवतालच्या'पैसा'त माझ्या अनेक मितीतील विचारांनी आकारास आलेल भावविश्व ...

आणि त्याच्या background ला कालच्या स्वप्नांची उजळणी करता करता...

आजच्या अनेक तुकड्यातून,

उद्याच्या de novo स्वप्नांची गुंतवळ करण्यासाठी अविरत झटणारं माझं subconscious..

आणि असंख्य सुरावटी ...

ह्या सगळ्या आणि इतरही अनेक layers आणि tracksची जाणीव पेलणारं

आणि तरीही आश्चर्यपूर्वक रित्या सुसंगत आणि एकाग्र,

my conscious..

आणि या सार्‍याच्या पलीकडे सुखनैव लिहीत राहाणारी, मी..


पण अचानक कधीतरी तंद्री भंगते...

आणि जगात कुठे कुठे किती वाजलेत याचा अदमास घेताना...

आठवणींशिवाय कुणीच सोबत नसल्याचा,

काहीसा सुखद आणि काहीसा खिन्न करणारा अनुभव येताना...

आपसूक नजर वळते..एरवी कोपर्‍यात टांगलेल्या त्याच्याकडे माझं अजिबात लक्ष जात नाही...

My wind chime...

कितीही जोराचा वारा आला तरी न वाजणारं, म्हणून very close to abstract and my heart :)

माझ्या best friends नी दिलेलं...

at a time when i had almost concluded that such thing cant exist...

But it does..

and it has made me hopeful..

that some day i will be in possession of the others on my wish list...


A black hole...customized...tailored to subtlety..

A reminder to hold on to nothing, yet everything...


and a couple of universes to multiply dimensional aesthetics...

for dynamism of perspective...

i saw their visuals in a documentary...

they are supposedly,

very small and beautiful things..

Like a wind chime... which almost doesnt chime... :)पण मी at peace असले,

तर त्याची मंद किणकिण जाणवते,

अखंड सोबत करणारी ... पण हवी तेव्हा जाणवणारी ...

like friendship...


त्यात आहेत एकमेकांना हलकेच स्पर्शून जाणारे Stars and Angels...

आणि ऐकायच ठरवलं ना तर त्यांचा आवाज इतका गोड आहे...

आणि स्वप्नाळू...

like lullabies...

आणि याच सगळ्या पसार्‍यामधे,

त्या संथ सुरावटींच्या वाटेवर तरंगताना..

somewhere in time and space...

is that elusive place ...

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...