Sunday, March 27, 2011

फिर छिडी रात बात फूलों की...

आज खूप दिवसांनी तो आणि मी एकदमच बाहेर पडलो..

असं होतं ना, तेव्हा आदल्या रात्री खूप पाउस पडलेला असतो बहुतेक करून..

आणि मी त्यातलेच थोडे सुट्टे शब्द खिशात टाकून बाहेर पडते.

आणायचा असतो साधा चहा ,पेपर आणि दिवस पेटवण्यासाठी काही तरी पोहे-बिहे..

पण चेहेर्‍यावर अश्वथाम्यासारखे भाव येत असावेत.

असेलही, कोणी बघितलाय तो काळा की गोरा ते..

पिवळाही असेल कदाचित..

आतून भगभगत असणार मा़झ्यासारखा..

आता तर त्याची गोष्टही आठवत नाही.

का घाबरायचो त्याला..?

कपाळावर ज़खम असलेल्या माणसांना घाबरायचो हे मात्र नक्की..

माझ्याकडेही बावचळल्यासारखे पाहात जातात लो़क..


इन्स्टिंक्ट्

किती विलक्षण गोष्ट आहे ना..

का, ते कळलं नाही तरी कशाला भ्यायचं, ते एका द्रुष्टिक्षेपात आकळतं..

अदभुत!खरचं..किती दिवसांनी तो आणि मी एकदमच बाहेर पडलो..

कालही खूप पाउस झाला..या गावात हे आक्रीत पहिल्यांदाच..

कारण काल ती इथे नव्हती..

ती अमर्याद आहे...

ती..

तिचं सगळेच ऐकतात..

ती..

ती काय पावसालाही झोपायला लावते निमूट्पणे..

पण काल ती इथे नव्हती..

क्षितीजा पलिकडल्या गावात लोकांनी तिचा अंमल झुगारून दिलाय अशी हूल उठल्ये कालपरवापासून..

म्हणून तडकच निघून गेली..

ती..

ती अमर्याद असायला हवी..

ती..

काल ती इथे नव्हती.

म्हणून हे आक्रीत.. या गावात पहिल्यांदाच...पहिल्यांदाच पाहिलं मी त्या झाडांना बहरलेलं..

पिवळ्या धम्मक फुलांनी....

रस्ताभर..नुसता खच..

धगधगत्या फुलांचा...

मी नुसती पहातच राहिले..


हं, तसं मी कालच लिहील होत त्याला, की आता एकदा पिवळ्या फुलांच्या शेतात जाउन यायला हव..

माझ्याकडची स्वप्नं आणि रंग संपत आलेत..

तिला ही द्यावे लागले नं..

ती..

थोडेच दिवस पुरतील आता जेमतेम..

पण आता निघायचच आहे म्हणा...

आणि प्रवासात कशाला हवय नसतं ओझ

त्यानेच तर नाही ना पाठवली?

पण मी तरी अजून कुठे पाठवलाय निरोप..


तो ही अमर्यादच आहे म्हणा..

पण त्याचा रंग वेगळाच आहे आणि स्वप्नं ही...

स्वप्न तर नाही ना...


काल पर्यंत तर ही झाडं आचरटासारखी हिरवी होती..

हं म्हणजे रस्त्याच्या कडेला थोडी फुलं असायची पडलेली...

पण कोमेजलेल्या फुलांचे रंग थोडी ओळखू येतात...


कदाचित.. फ्रिजमधे काल जास्तीची उरलेली एक दोन स्वप्नं होती.. त्यातलं असेल..

मित्रमंड्ळी आम्ही एकत्रच जेवतो बर्‍याचदा..

कालही..

त्यांना माहीत असेल म्हणून फोन केला तर झोपेत...


असेलही स्वप्नं, म्हणाला त्यातला एक जांभई देत...

म्हणून लगेच संपवायची घाई नको हं...

आम्ही येईपर्यंत थांब जरा...


मं मी फिरत राहिले...

त्या रस्त्यावरच्या एक एक झाडापाशी थांबत...

विस्फारून न्याहाळत...

ती पिवळी धम्मक फुलं...लाखो...लाखो...

माझ्या मोकळ्या केसांतही अलगद येत होती अधून मधून......

आक्रीतच हे...

रस्ताभर..नुसता खच..धगधगत्या फुलांचा...

पिवळ्या धम्मक फुलांनी..झाडं बहरलेली...अजून कसं कोंणी येत नाही...

डोळे मिटून जागं व्हायचा प्रयत्न करून पहायला हवा...

आणि त्याला हे कळवायला हवं..

आता समुद्रावरच जाउ...

ते जास्त आवडेल त्याला..

त्याच्यासारखाच, अमर्याद...तो..तिने हटकलं ना..

ते ही चांगलच भगभगीत हसून...पिवळ्या धम्मक फुलांसारखं....

खूप वेळ मिटलेले डोळे मिचकावत मी मागे सरले...

त्या सरशी तिने एका फराटयात समोरची फुलं कडेला लोटली..

आणि सराईत पणे टोपलीत भरली..

पुन्हा तिचा भगभगीत चेहेरा पाहाण्याआधी जरा प्रकाशाचा सराव करावा म्हणून वर नजर वळवली तो..

झाड टक्क हिरव झालेलं..एक..दोन..सगळीच...

आता माझा चेहेरा बावचळलेला असणारं..

कारण तिचा चेहेरा बोलायला उत्सुक होता..

थोडासा हिरवा...


का एवढी साफसफाई ?..ती आज परत येणारे का ?

ऱोजचच हाय सारं...ती उगाच गडद होत होत दिसेनाशी झाली...


आता सगळा रस्ता नको तेवढा ओळखीचा...

फक्त रस्त्याच्या कडेला थोडीशी फुलं...

पण त्यांचे रंग ही कुणालाच ओळख देईनासे..

तिच्या येण्याची सावली पडल्यामुळे कदाचित..आपल्याला जे हवहवसं वाटत होतं...त्या सार्‍याचा खच पडला होता आज...

मं मी पुन्हा कफल्ल्क कशी...?

माणसं कशालाही भितात...

कपाळावरच्या जखमांना..

ल़ख्ख जागरणं करणार्‍यांना..

स्वप्नांना...

पिवळ्या धम्मक फुलांना...

हो..

पिवळ्या धम्मक फुलांना...

इन्स्टिंक्ट् ...आता तरी डोळे मिटावे म्हणून पुन्हा त्याच्याकडेच पाहिलं...

आज खूप दिवसांनी तो आणि मी एकदमच बाहेर पडलो..

या गावात पहिल्यांदाच...

म्हणून हे आक्रीत..

माझ्या चेहेर्‍याचा रंग उडालेला दिसतोय..

त्याच्या हसण्यातही आता चाहूल आहे..

पिवळ्या धम्मक फुलांचीimage: http://seankane.wordpress.com/tag/flowers

10 comments:

 1. तू स्वैर लिहित गेलीस
  मी अधीर वाचत गेलो
  तू असशील आता मुक्त मुक्त
  मी मात्र हरवत गेलो
  :)
  (काही समजल नहीं खर म्हणजे, पण ती ग़ज़ल आवडते मला! फिर छिड़ी रात! )

  ReplyDelete
 2. Kunitari manala vatel tase rang canvas var fekat rahave ani tyatun tyachya nakalat chitra nirman vhave ashi kavita..

  ReplyDelete
 3. @ bhavin ...apologies :)
  @ Harshada... pretty precise..

  ReplyDelete
 4. very nice anu :) i loved it ...very nice articulation!

  ReplyDelete
 5. gondas chhan lihilayas..avadale mala

  ReplyDelete
 6. anu,
  lihilaes chaan, pan arth kai lagla nai bua!

  ReplyDelete
 7. 'Ye kya baat hai...'
  he waqya kautakaspad nasun prashnarthak aahe.
  Actually ase bolayche hote mala-
  'Ye kya baat hai, ye jara samjhake batao?'
  majhya palthya ghadyawar hi kavita padli :)

  ReplyDelete
 8. ts just some random strokes..explanations are seldom charming, yet.. hi kavita nahiye...vicharanna innate rhythm aslya mule tasa bhas hot asawa.. yatla ek 'to' surya ahe..ani dusra "to" priyakar ahe..."ti" !!!!
  "ti" kunihi asu shakte...kuni ek samradni..ayushyacha taba ghenari ekhadi vyakti...kinva "Zop"...

  kahi swapna..kahi vyakti..take a heavy toll on our being... yellow flowers are my dreams...my dreams are my means to living... you have to sow them..look after...reap and spend...

  pratyekacha ek rang asto..in a way it symbolizes
  the life ..urja..

  kahincha ranga piwala asto.... kahinna ayushyakadun fakta piwali fula havyet...

  aplyasathi durmil aslelya vastunche ase sahaja sahaji rastyat sade padu lagle..tar kay karal..
  will you embrace it?

  sukh mala bhivavite...asa ka hota manasancha.. ?

  innate fears, insticts yetaat kuthun...?

  baki jagatepanichi swapna astaat ka swapnat jage asto apan he kuni sangav...

  kahi swapna apan mitra barobar share karto...ti poorna zalyavarcha anandatla hi vata tyanna hava astoch na...

  kharach kadhi explain karu naye..

  i feel violated..

  ReplyDelete
 9. Hi Anushree,
  Really sorry if I hurt your feelings,
  Tu explain kelyawar khup kahi kalal.
  Tu khup chan lihites.
  Keep writing,
  Smile :)

  ReplyDelete
 10. hey prakash ,nothing to be sorry about. it wasnt you..not at all.. :)

  its just sometimes i am so overwhelmed by the urge to write..later even i m unsure of what to comprehend..and would i be deceiving people by offering an explanation...

  anyways..it sure feels good to hear that u like my writing :) m smilin...

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...